Wednesday 22 August 2012

स्थलांतर


 स्थलांतर

हिंदू आदिवासी आणि घुसखोर बांगलादेशी मुस्लिम यांच्यात गेले काही दिवस रक्तरंजित संघर्षातून उदभवलेले घुसखोरांचे हत्याकांड आणि त्यातून संतापलेले मुसलमाण नेते,मौलवी यांच्या चिथावणी खोर भाषणामुळे तासभर cst परिसरात झालेला हिंसाचार.....रुपयांचे नुकसान.........
पोलिसांच्या अब्रूवर घातलेला घाला..... अमर जवान ज्योती वर हॉकी स्टीक प्रहार ......
                                   काही समाजकंटक म्हणजे मुंबईत बांगलादेशी घुसखोर यांनी मन मर्जीनुसार  घातलेला धांगड धिंगा. यांना आपल्या धर्माविषयी किंचितही प्रेम नाही.जो सच्चा मुसलमान असता तर त्याने रमझानच्या महिन्यात
हिंसाचार करू शकत नाही.उपवासाचे पावित्र्य सांभाळणारे धर्मप्रेमी मुसलमान वेगळेच.ते या हिंसाचाराचे समर्थनही करणार नाहीत.



     मौलाना वाहिउद्दिन खान यांनी मांडलेले विचार अत्यंत महत्वाचे वाटतात. स्थलान्तारीताने  जेथे जावे तेथे स्थानिक संस्कृती, भाषा, विचार आपलेसे करावेत.आपण दुसऱ्या कडे आश्रयाला जावे अन त्याच्या  डोईवर बसून  मिजासी दाखविण्याचा अट्टाहास करू पाहत असाल तर ते तुम्हाला तुमची जागा दाखविल्याशिवाय राहणार
नाहीत.
  अब्दुल कादिर मुकादम, रझिया पटेल आदि मुस्लीम विचारवंत,सामाजिक बांधिलकी असलेली मंडळी यांची परखड मते विचारात घेणे
 सारखी आहेत.भारतातून बांगलादेशात  अथवा पाकिस्तानात गेलेल्या मुसलमानानां आपापल्या मतानुसार वागू दिले का?
                  एका प्रांतातून  दुसऱ्या प्रांतात स्थलांतर करायचे असेल तेथील संस्कृती भाषा आचार विचार यांची जपणूक केली तर तुम्ही भारतात कोठेही राहू शकता.
   कुबडीला असं वाटतं,की आपल्या आधाराशिवाय माणूस चालू शकतच नाही.पण माणसाच्या आधाराशिवाय कुबडीही उभी राहु शकत नाही.हे कोणी कोणाला सांगायचे?
भडकविणारे भडकवून जातात अन निरपराध जनसमुदायाचे बळी जातात.  आई बापाची कुबडी होऊ पाहणारी तरणीबांड पोर हिंसाचाराचे बळी पडतात...... अन आपल्या आधाराशिवाय जगू शकत नसलेल्या बायकापोरांना उघड्यावर सोडून दूर दूर जातात. अशा ठिकाणी स्थलांतर करतात की, तेथून परतावा नसतो.



twitter.com



          

Friday 3 August 2012

mitra


           मित्र
मैत्री असावी अशी मैत्री
मैत्री असावी अशी मैत्रीसारखी
हसत राहणारी हसवत राहणारी
संकटकाळी हात देणारी
आनंदी समयी साद घालणारी
मनाची कवाडे उघडून डोकावणारी
काहीं गुपितांचे राखण करणारी
मन मोकळे करुन सारं सांगणारी
सांगता सांगता मोहीत करणारी
कधी कुणाला न लुटणारी
चांगल्याच कौतुक करणारी
तितकीच चूका दाखिवणारी
शूध्द सोन्याप्रमाणे चम चम चमकणारी